भारतीय इनडोअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पार्थ

By Admin | Updated: June 5, 2014 02:05 IST2014-06-05T01:50:58+5:302014-06-05T02:05:58+5:30

भारतीय इनडोअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पार्थ

Partha as the captain of the Indian Indoor Cricket Team | भारतीय इनडोअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पार्थ

भारतीय इनडोअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पार्थ

  नाशिक : ट्रायसेरिज इनडोअर क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय संघाच्या कर्णधारपदी येथील पार्थ दिनेश पटेल याची निवड झाली असून, हा संघ श्रीलंकेकडे रवाना झाला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्टÑ संघाने उत्तम कामगिरी केली. महाराष्टÑ संघाचा कर्णधार म्हणून पार्थ याने उत्तम कामगिरी करून महाराष्टÑ संघाला अजिंक्यपद मिळवून दिले होते. या स्पर्धेतूनच भारताचा संघ निवडण्यात आला. महाराष्टÑाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यामुळे या संघातील अनेक खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. संघात पार्थ पटेल (कर्णधार), चिन्मय पुराणिक, भूषण सौद, अभिषेक पाटील, प्रयाग पाटील, विरेन ठक्कर, ओम राणा, आयुष पगारे आदिंचा समावेश आहे. नाशिक प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत गेल्या दोन वर्षांपासून सतत अजिंक्यपद मिळविणार्‍या ‘नाशिक चॅलेंजर्स’ या संघाचे दिनेश पटेल यांचा पार्थ हा चिरंजीव आहे. नाशिक चॅलेंजर्स संघाच्या पदाधिकारी नेहा दिनेश पटेल, महाराष्टÑ इनडोअर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ कडभाने, अशोक दुधारे, सिल्व्हर ओक शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. मंगल सारथी, नरेश पाटील आदिंनी या संघाला शुभेच्छा दिल्या. पूनम महाजन या संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापक आहेत.

Web Title: Partha as the captain of the Indian Indoor Cricket Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.