पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST2019-03-27T00:06:19+5:302019-03-27T00:10:59+5:30
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे मंगळवारी (दि.२६) रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.

पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन
नाशिक : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे मंगळवारी (दि.२६) रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. मनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजपाचे प्रदेश कार्यालयीन चिटणीस मुकुंद कुलकर्णी यांनी सकाळी त्यांचा अस्थिकलश नाशिकमध्ये आणला. विधी झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते रामकुंडात पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. पौरोहित्य सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतीक शुक्ल यांनी केले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सरचिटणीस उत्तमराव उगले, नंदू देसाई, देवदत्त जोशी आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन करताना मुकुंद कुलकर्णी, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, रंजना भानसी, सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे आदी.