परीट-धोबी समाज आरक्षण आंदोलन
By Admin | Updated: October 24, 2016 23:38 IST2016-10-24T23:37:35+5:302016-10-24T23:38:15+5:30
निफाड : राज्य कार्यकारिणी बैठकीत नियोजनसंदर्भात चर्चा

परीट-धोबी समाज आरक्षण आंदोलन
कसबे सुकेणे : सरकार लोकशाही मार्गातून आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला परत करत नसल्याने येत्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात ४० लाख परीट-धोबी समाजबांधव संघिटत होतील, असा निर्णय निफाड येथे झालेल्या महाराष्ट्र परीट-धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र परीट-धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्षय एकनाथ बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी घेण्यात आली. दोन सत्रात झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना एकनाथ बोरसे म्हणाले की, राज्यात अजूनही समाज उपेक्षित आहे. आगामी काळात आरक्षणासाठी संघटन मजबूत करून हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले जाईल असे आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीस गुणवंत फाले, सुकाणू समितीचे किसन जोर्वेकर, महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना गायकवाड, राजेंद्र खैरनार, संतोष भालेकर, विमल खंडाळे, सोनईचे सरपंच अंबादास राऊत, दामोधर दामले, गजाजन गवळी, पेठच्या नगरसेवक लीला निकम , राजाराम कनोजिया, रामदास शिंदे, नंदकुमार राक्षे, शंकर लुंगसे, गणेश चौधरी, रजनी लुंगसे, आदि उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा, स्वर्गीय स्वतंत्र सैनिक बा. य. परीट यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. बाळासाहेब रंधवे, सुनील राऊत, किरण वाघ, योगेश सगर, मधुकर राऊत, प्रमोद आहेर, राजेंद्र रणशिंगे, विजय राऊत, दत्तू शिंदे, बाळासाहेब लुंगशे, सुनील जमधडे, संजय जमधडे, महेश गवळी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विक्रम रंधवे यांनी केले. ( वार्ताहर)