ठाणगाव येथे पालक मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:48 IST2019-07-09T18:47:46+5:302019-07-09T18:48:10+5:30

ठाणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वानुमते उत्तम शिंदे यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 Parents meet at Thanganga | ठाणगाव येथे पालक मेळावा उत्साहात

ठाणगाव येथे पालक मेळावा उत्साहात

शाळेच्या प्रांगणात झालेल्या या मेळाव्यास मुख्याध्यापक महेश गायकवाड, नामदेव शिंदे, उत्तम शिंदे, रामदास भोर, सुभाष शिंदे, शांताराम शिंदे, शरद काकड आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक गायकवाड यांनी पोषण आहार, शालेय लाभाच्या योजना व वाटप, पटनोंदणी पंधारवाडा, शालेय इमारत बांधकाम, शालेच्या भौतिक सुविधा शाळेसाठी वाल कंपाऊंड याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नितिन पाटोळे, रामहरी शिंदे, संजय शिंदे, सागर आंबेकर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Parents meet at Thanganga

टॅग्स :Schoolशाळा