नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंटेनर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:29 IST2019-06-25T00:28:49+5:302019-06-25T00:29:09+5:30
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंपनीसाठी लागणारे मशीन घेऊन जाणारे अवजड कंटेनर उलटल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. पोलिसांनी वेळीच क्रेन बोलावून कंटेनर बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंटेनर उलटला
सातपूर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंपनीसाठी लागणारे मशीन घेऊन जाणारे अवजड कंटेनर उलटल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. पोलिसांनी वेळीच क्रेन बोलावून कंटेनर बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.
त्र्यंबकेश्वरकडून अंबड औद्योगिक वसाहतीत मशीन घेऊन जाणारे अवजड कंटेनर सोमवारी दुपारी पपया नर्सरी चौकात पलटी झाले. सुदैवाने त्यात काही हानी झाली नाही. मात्र नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यात बघ्यांची गर्दीही वाढली होती. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले तरीही या घटनेची माहिती झाल्यानंतर बघे घटनास्थळी येतच होते.
अखेर जाधव संकुल पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी क्रेन बोलावून पलटी झालेला कंटेनर सरळ करून त्यावर मशीन ठेवले आणि कंटेनर मार्गस्थ झाल्याचे प्रत्यक्षदर्शांनी सांगितले.