परसूलला अखंड हरिनाम सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:13 IST2018-04-09T00:13:21+5:302018-04-09T00:13:21+5:30

चांदवड : तालुक्यातील परसूल येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवारपासून (दि. ६) प्रारंभ झाला.

Parasoolala Akhand Hari Nama Week | परसूलला अखंड हरिनाम सप्ताह

परसूलला अखंड हरिनाम सप्ताह

चांदवड : तालुक्यातील परसूल येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवारपासून (दि. ६) प्रारंभ झाला. सप्ताह काळात रोज काकड आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी प्रवचन, रात्री कीर्तन होत आहे. संजय ठाकरे, धोंडीराम अहेर वडाळीभोई, संजयानंद महाराज शिंदे कानमंडाळे यांचे प्रवचन, श्रावण महाराज अहिरे कुकाणे, अनिल महाराज पाटील आळंदी, ज्ञानसिंधु संदीपन महाराज शिठदे आळंदी यांची कीर्तने झाली. सप्ताह दि. १३ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Parasoolala Akhand Hari Nama Week

टॅग्स :Nashikनाशिक