शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.

येवला : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.  उत्तर पूर्व भागात तर पिके करपून गेली; मात्र पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार या भरवशावर लाल कांदा, जनावरांसाठी चारा पिके उभी केली. तालुक्यात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी आंदोलने केली. पालखेडचे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंत द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे करूनही येवला तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. १५ नोव्हेंबरनंतर पाणी आल्यावर उभी पिके करपून जातील, अशी भीती शेतकºयांच्या मनात आहे. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत ओरड करूनसुद्धा येवलेकरांच्या पदरी काही पडले नाही. जेवढे दिवस पाणी उशिरा येईल तेवढे शेतकºयांचे नुकसान होऊन दुष्काळात हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो का? अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. पालखेड डावा कालवा प्रशासनाने तातडीने आवर्तन चालू करून शेतकºयांची उभी पिके वाचवावी व नंतर कागदी सोपस्कार पार पाडावे, कारण १५ आॅक्टोबरचा पाणीसाठा गृहीत धरून कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याचे सिंचन, बिगर सिंचन आरक्षणाचे नियोजन केले जाते; मात्र यावर्षी अद्यापही काहीही नियोजन झालेले नाही. याचा फटका शेतकºयांना बसत असून, हेच का शेतकºयांना अच्छे दिन! असा टोला शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, मल्हारी दराडे, शिवाजी वाघ यांनी लगावला आहे.दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील संदेशावरून पाच दिवसांत आवर्तन मिळणार असल्याचे संदेश फिरत होते; मात्र जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे शेतकरी संघटनेने संपर्ककेला असता ठोस उत्तर मिळाले नाही. अद्याप पाणी नियोजन आराखडा तयार करण्याचे काम चालू असल्याचे समजले. तालुक्यात सध्या पालखेडचे पाणी आवर्तन मिळणार असल्याची चर्चा आहे; मात्र पाणी कोटा किती मिळेल? आवर्तन किती दिवस चालणार? याबाबत ठोस माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीWaterपाणी