शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणासह पाडस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:22 IST

नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला.अपघातात अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने मादी हरणाचा तसेच जन्माला येण्याच्या अगोदरच पिलाचा मृत्यू झाल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गतवर्षी या भागात पाऊस न पडल्याने नागरिकांसह वन्यप्राण्यांनादेखील या दुष्काळाची चांगलीच झळ पोहोचत आहे. पाऊसच न पडल्याने शिवारातील सर्व नदी-नाले तसेच बंधारे कोरडे आहेत.साकोरा रस्त्यावर असलेला मोरखडी बंधारा यावर्षी कोरडाच आहे. त्यामुळे परिसरातील वन्यजीव पाण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. नेहमीप्रमाणे एक गरोदर हरीण नांदगाव-साकोरा रस्त्यावर पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात पोट कापले जाऊन अतिरिक्त प्रमाणात रक्तस्राव झाला. काही क्षणभर नवजात पाडस बाहेर आले. कुत्रे त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पाडसाची सुटका केली, मात्र काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. हे सर्व दृश्य पाहून उपस्थितांना गहिवरून आले होते. वनविभागाचे वनक्षेत्रपाल बी.एस. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.जे. सूर्यवंशी, जे.ए. अमलुक तसेच वनरक्षक शिरसाठ सुरेंद्र यांनी पंचनामा करून वनविभागाच्या हद्दीत माय-लेकाचा दफणविधी केला.परिसरात हरणांची व मोरांची संख्या चांगली आहे; मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले असल्याचे वन्यप्रेमींनी म्हटले आहे. संबंधित विभागाने या वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातwildlifeवन्यजीव