निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी

By Admin | Updated: December 3, 2014 01:55 IST2014-12-03T01:54:34+5:302014-12-03T01:55:30+5:30

निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी

Pappri in Avipaliya | निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी

निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी

निफाड : येथील पुरातन श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार, कलशारोहण व ध्वजप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर देवस्थान संस्थानच्या वतीने सोमवारी (दि. १) सकाळी ८ वा. ‘श्री’ची व कळसाची सवाद्य मिरवणूक वाद्यवृंदासह निफाड शहरातून काढण्यात आली होती. या मिरवणुकीस श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत सजवलेल्या रथात श्री विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा, ध्वज, श्री संत नामदेव पायरी, गरुड, हनूमान मूर्ती, कासव प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीतील नाशिक येथील गुलालवाडी व्यायामशाळेच्या स्त्री-पुरुष कलावंतंच्या झांज पथकाने चांगलीच रंगत आणली व निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत अश्व, सजवलेल्या बैलगाड्या होत्या. वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. या मिरवणुकीत सामील झाले होते. या भव्य मिरवणुकीत निफाडकर नागरिक, स्त्री या बालगोपाळ मोठ्या गर्दीने उपस्थित झाल्याने या सर्व वैविध्य प्राप्त केलेल्या मिरवणुकीमुळे अवघी पंढरी निफाडमध्ये अवतरल्याचे चित्र उभे राहिले होते. ही मिरवणूक विठ्ठल मंदिर, नवीन सरकारी दवाखाना, उगावरोड, बसस्थानक, तहसील कार्यालय, मुसलमान गल्ली, माणकेश्वर चौक, पेठ गल्ली, शनी चौकमार्गे पुनश्च विठ्ठल मंदिर येथे आणण्यात आली. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. या मिरवणुकीने सर्व निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले होते. सकाळी ११ वा. मंडप प्रवेश, शांती सुक्त पठण, देवता स्थापना, देवता अभिषेक, अग्नि स्थापन, पुष्प व तुलसी अर्चना, मंगल आरती व स्तुतिपाठ आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. होमहवन पूजेसाठी ३१ जोडपे बसले होते. आचार्य श्री जगदीश कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, रितेश देशपांडे यांच्यासह इतर ब्रह्मवृंदांनी यांनी मत्रोच्चारात धार्मिक विधी केले. श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दुपारी नाशिक येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळाने भजन म्हटले. श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त विविध कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी रात्री रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे प्रवचन संपन्न झाले.

Web Title: Pappri in Avipaliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.