लासलगाव : येथील डॉक्टर बंदछोडे हॉस्पिटलजवळ शनिवारी दुपारी चार वाजता खरेदी करून घरी जाणार्या तीन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्न अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. सुजाता बिश्वास असे या महिलेचे नाव आहे. लासलगाव येथील बाजारपेठेतील खरेदी करून घरी परतत असताना चोरटे गाडीवर आले. मंगळसूत्न हिसकावून पलायन करणार्या चोरट्यांचा एका युवकाने पाठलागही केला. या महिलांनी बरीच आरडाओरड केली. याबाबत लासलगाव पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतत होणार्या चोर्यांमुळे लासलगाव परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत.लासलगाव येथील गणेशनगर, विद्यानगर, लासलगाव महाविद्यालय रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांत पाच ते सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. परंतु त्याचा तपास लागलेला नाही. गेले काही दिवस लासलगाव शहरासह पिंपळगाव नजीक तसेच शास्त्रीनगर परिसरात चोरटे येत असल्याच्या भीतीने युवक जागरण करीत गस्तीवर दिसत आहेत. विंचूर भागात तर वस्तीवर राहणारे शेतकरी आपल्या घराभोवती रात्नभर मोठय़ा प्रकाशझोताचे दिवे लावीत आहेत. रात्नी व दिवसा अनोळखी दिसणार्या लोकांकडे चोर असल्याच्या नजरेतून लोक पाहतात. अशा घटना दररोज होताना दिसून येत आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्नीतून चार ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच रात्नीत चार घरफोड्या झाल्या आहेत.दीड महिन्यापूर्वी रविवारी रात्नीच्या सुमारास चोरट्यांनी बालाजीनगर येथील डॉ. श्रीनिवास दायमा यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चार तोळे सोने, चांदी शिक्के असा सुमारे ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शांतीलाल चंडालिया यांच्या राहत्या घरी, मापारी यांच्या दुकानात आणि श्रीमती दगडे यांचे टायरचे दुकानही फोडण्यात आले. शहरात एकाच रात्नीत झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लासलगाव येथील सरस्वती शाळेतील शिक्षक असलेले धर्मेश साजन निकम हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या मूळगावी वाखरवाडी (ता. देवळा) येथे कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणीही व्यक्ती नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून ६९ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.सर्व्हे नंबर ९३ मध्ये फुलचंद रतनचंद दगडे यांचे राजेश एजन्सी नावाने होलसेल मसाला विक्र ीचे दुकान आहे. शुक्र वार, दि. १0 ऑगस्टला मध्यरात्नी दुकानाचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. काजूचे दहा किलोचे पन्नास डबे व बदामबीचे वीस कट्टे असा एकूण ७0 हजार रु पयांचा माल चोरून नेला आहे. दोन महिन्यांपूर्वी उमराणे येथील व्यापार्याचे काही लाख रु पये गाडीची काच फोडून लुटून नेले. संशयिताचे रेखाचित्न मिळूनदेखील अद्यापपर्यंत तपास हा गुलदस्त्यात आहे. लासलगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी श्यामसुंदर मालपाणी यांच्यावर केलेल्या गोळीबारातील आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे; परंतु त्यानंतर एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. तीन महिन्यांत परिसरामध्ये लहानमोठय़ा आठच्या वर चोरीच्या घटना घडलेल्या असून, अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. (वार्ताहर)
लासलगावी चोरट्यांची दहशत
By admin | Updated: August 23, 2015 22:20 IST