दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने घबराट

By Admin | Updated: May 29, 2014 16:28 IST2014-05-29T00:12:16+5:302014-05-29T16:28:30+5:30

मालेगावी सध्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Panic due to the increase in theft of a bike | दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने घबराट

दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने घबराट

मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये येथील एंडायत मळा भागातील दुचाकी चोरीला गेल्याने रहिवाशांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. काल रात्री कॅम्प रस्त्यावरील पुन्हा एक दुचाकी (पॅशन-प्रो क्र. एमएच ४१ एन-६०५६) चोरीला गेली. विशेष म्हणजे ही दुचाकी एका मोठ्या हॉस्पिटलच्या कम्पाऊंडमध्ये कुलूप लावलेल्या स्थितीत असताना, मोठे दरवाजे उघडून चोरीस गेली. येथे रखवालदार असतानाही मोटारसायकल चोरीस गेल्याने रहिवाशांत घबराट पसरली आहे. या घटनेची तक्रार मोटारसायकल मालक अनिल पाटील (रा. एंडायत मळा) यांनी दिली. सकाळी चोरीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलिसांना येथील नागरिकांनी धारेवर धरले. यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परिसरात पोलीसांनी गस्त वाढविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Panic due to the increase in theft of a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.