पांगरी तीन दिवस बंद; नियम मोडल्यास कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:20 IST2020-07-13T22:11:08+5:302020-07-14T02:20:03+5:30

पांगरी : सिन्नर तालुक्यात पांगरी व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पांगरी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समिती यांनी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pangri closed for three days; Action for breaking the rules | पांगरी तीन दिवस बंद; नियम मोडल्यास कारवाई 

पांगरी तीन दिवस बंद; नियम मोडल्यास कारवाई 

पांगरी : सिन्नर तालुक्यात पांगरी व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पांगरी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समिती यांनी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली असून, अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच पांगरी गावात एक ४५ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाची धावपळ उडाल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यकरीत्या घराबाहेर पडणे टाळावे, मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
-----------------
भाजीबाजार बंद
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात भरविण्यात येणारा शनिवारचा भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामप्रशासन आणि दक्षता समितीने घेतला आहे. गावातील १०० टक्के लॉकडाऊनबाबत दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात आले आहे. तसेच सर्व अस्थापनांना नोटीस देण्यात आल्याचे सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांनी सांगितले.
दूध संकलनाची वेळ
लॉकडाऊनच्या काळात सर्व दूध उत्पादक शेतकरी सकाळी ७.३० वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रात दूध जमा करतील. किराणा दुकाने, कापड दुकाने, हॉटेल्स, टपरी, शेतीविषयक दुकाने, बार व देशी दारूची दुकाने, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने, भाजीपाला विक्री यांसह सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.
प्रशासन ठेवणार लक्ष
ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती यांची बैठक होऊन सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांच्या सूचनेनुसार सोमवार पासून बुधवारपर्यंत वैद्यकीय सेवा आणि बँकवगळता सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व इतर आस्थापना बंद राहणार आहे. वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, वैद्यकीय अधिकारी वैद्य परिस्थितीवर लक्ष ठेवतील.

Web Title: Pangri closed for three days; Action for breaking the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक