युवक मराठा महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी पांडुरंग शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:00+5:302021-09-26T04:15:00+5:30

येवला : अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तालुक्यातील धुळगाव येथील पांडुरंग शेळके यांची निवड झाली आहे. पुणे ...

Pandurang Shelke as District Working President of Youth Maratha Federation | युवक मराठा महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी पांडुरंग शेळके

युवक मराठा महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी पांडुरंग शेळके

येवला : अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तालुक्यातील धुळगाव येथील पांडुरंग शेळके यांची निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या महासंघाच्या राज्य बैठकीत ही निवड करण्यात आली.

महासंघाची नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्यासाठी राजकीय भूमिका घेण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

यावेळी नाशिक ग्रामीण युवकचे जिल्हाअध्यक्ष विलास जाधव, जिल्हाध्यक्ष नीलेश मोरे, सरचिटणीस आप्पासाहेब गाडे यांचीही नव्याने निवड करण्यात आली.

दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विविध सामाजिक संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रवीण निकम, सुदाम पडवळ, आदी उपस्थित होते. (२४ शेळके)

240921\351824nsk_36_24092021_13.jpg

युवक मराठा महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी पांडुरंग शेळके .

Web Title: Pandurang Shelke as District Working President of Youth Maratha Federation