पंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य मोहिमेस प्रारंभ
By Admin | Updated: May 6, 2017 23:52 IST2017-05-06T23:51:22+5:302017-05-06T23:52:10+5:30
नाशिक : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्य तपासणी मोहिमेचे बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य मोहिमेस प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्य तपासणी मोहिमेचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.
१ मे रोजी या अभियानास प्रारंभ झाला असून, २७ मेपर्यंत ते राबविले जाणार आहे. गणेशवाडीतील आरोग्यशाळा रुग्णालयात ही मोहीम सुरू करण्यात आली. वैद्य विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वैद्य आशुतोष यार्दी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी वैद्य शीतल चव्हाण, वर्षा साधले, डॉ. ज्योती गायकवाड, एकनाथ कुलकर्णी, रमेश भट, शिशिर पांडे, किरण जोशी, कमलेश महाजन आदि उपस्थित होते.