पांडवनगरी बसथांब्यालगत भाजीबाजारामुळे कोंडी

By Admin | Updated: March 8, 2016 00:17 IST2016-03-07T23:37:56+5:302016-03-08T00:17:05+5:30

पांडवनगरी बसथांब्यालगत भाजीबाजारामुळे कोंडी

Pandavnwali bus stand due to the ban on vegetables | पांडवनगरी बसथांब्यालगत भाजीबाजारामुळे कोंडी

पांडवनगरी बसथांब्यालगत भाजीबाजारामुळे कोंडी

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पांडवनगरी बसथांब्यालगत अनधिकृत भरणाऱ्या भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या ठिकाणचा भाजीबाजार हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कलानगर ते पाथर्डीगावापर्यंत वडाळा-पाथर्डी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. यामध्ये रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यामध्ये खजुराची व शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत. तसेच पादचाऱ्यांसाठी पदपथही तयार करण्यात आले. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यालगतच शरयूनगर, समर्थनगर, पांडवनगरी, सार्थकनगर यांसह विविध उपनगरे आहेत. तसेच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तर दोन महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सायंकाळी पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २० ते २५ भाजीविक्रेते व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहतात.
येथे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना अडथळ्याची शर्यत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी नसतानाही सर्रास नियमांचे उल्लंघन होत असूनही मनपाचे अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Pandavnwali bus stand due to the ban on vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.