शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पंचवटीच्या वीजवाहिनीत बिघाड

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

पावसामुळे पंचवटीच्या वीजवाहिनीत बिघाड

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहरासह जिल्ह्यातील वीज यंत्रणा कोलमडली असून, गोदावरी - दारणाच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांचाही वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला होता, तर पंचवटी भागाला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत मुख्य वाहिनीत बिघाड झाल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पंचवटीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीत पावसामुळे बिघाड (इंटरप्शन) झाल्याने परिसरातील सुमारे १३ रोहित्रे बंद झाली. त्यामुळे पंचवटीतील मोठ्या परिसराचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. १३पैकी नऊ रोहित्रे रात्री उशिरापर्यंत सुरू झाल्याने काही भागात वीजपुरवठा सुरळीत होता; मात्र कृष्णानगर परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर द्वारका परिसराचाही वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. शहरासह जिल्ह्यातही पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून प्रयत्न केले जात असून, संततधारेमुळे कामात अडथळे येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील पंचवटी, नदीकाठचा परिसर, तर जिल्ह्यातील काही भाग अंधारात होता. (प्रतिनिधी)