पावसामुळे पंचवटी एक्सप्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:40 IST2020-09-23T23:36:01+5:302020-09-24T01:40:26+5:30
नाशिकरोड : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नाशिककरांसाठी मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना सुट्टी घेण्याची पाळी आली.

पावसामुळे पंचवटी एक्सप्रेस रद्द
नाशिकरोड : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नाशिककरांसाठी मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना सुट्टी घेण्याची पाळी आली.
लॉकडाउनमुळे पंचवटी एक्सप्रेस गेल्या सहा महिन्यापासून बंद होती. पंचवटी एक्सप्रेस नुकतीच सुरु झाली असून तिला नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यामुळे बुधवारी मुंबईतील लोकल सेवा तसेच सरकारी कार्यालये बंद होती. तसेच पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावर पाणी साचलेले आहे. पावसाची जोरदार हजेरी सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून बुधवारी पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. कसा-याहून देखील लोकल नसल्यामुळे मुंबईला अप-डाऊन करणा-या नाशिककरांना घरीच थांबावे लागले.