शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:46 IST

परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.

पंचवटी : परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पेठरोड परिसरात चित्ररथ काढून तीन पुतळे येथे अभिवादन करण्यात आले.मालेगाव स्टॅण्ड, पेठरोड, दत्तनगर, फुलेनगर, शनिमंदिर, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, आरटीओ कॉर्नर, मेरी, म्हसरूळ, जकात नाका, क्रांतिनगर, एरंडवाडी, मखमलाबादरोड, गौतम कॉलनी आदी परिसरात अभिवादन करण्यात आले. पेठफाटा येथून काढलेल्या मिरवणुकीत भीमसैनिकांनी ठेका धरला होता. शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पेठरोडहून निघालेल्या मिरवणुकीचा फुलेनगर तीन पुतळे येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे चित्ररथात ठेवण्यात आले होते. मिरवणुकीनंतर रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक शांता हिरे, जगदीश पाटील, पद्माकर पाटील, लक्ष्मण धोत्रे आदींसह भीमसैनिक संख्येने उपस्थित होते.बँक आॅफ महाराष्ट्र आंचल कार्यालयात आंबेडकर जयंतीपंचवटी : बँक आॅफ महाराष्ट्र एससी एसटी अँड ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशन आणि बँक आॅफ महाराष्ट्र आंचल कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात साजरी करण्यात आली होते. या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून आंचल प्रमुख प्रफुल्ल पालीवाळ, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर सोनकुसाळे, बँक आॅफ महाराष्ट्र संघटनेचे राजन भालेराव आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाथरकर, विनोद मौजे, राजनभालेराव, मंगेश रोकडे, अमोल राजभोज, तुषार राजगुरू, रणजित शेवाळे, शिरीष जहागिरदार,आदित्य तुपे, श्रीराम बोरसे, अशोक डोकफोडे, संतोष बागले, पवन डेरले, अमोल जाधव आदींसह बँक आॅफ महाराष्ट्र ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.मखमलाबाद येथील ओम दुर्गा माता मित्रमंडळपंचवटी परिसरातील स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद येथील ओम दुर्गा माता मित्रमंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवाजी बर्गे, गणेश बानाईतकर, टी. जी. अहिरे, संदीप धात्रक, तुषार गांगुडे, आबा बांडे, स्वप्नील मानकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNashikनाशिक