मानोरी परिसरातील पिकांचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:07 IST2019-10-31T23:07:25+5:302019-10-31T23:07:48+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात पावसाने मका सोयाबीन, द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून (दि.३१) प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून, झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.

मानोरी परिसरातील पिकांचे पंचनामे
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात पावसाने मका सोयाबीन, द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून (दि.३१) प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून, झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.
मानोरी परिसरात परतीच्या पावसाने मका, सोयाबीन, द्राक्ष पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासनाने लादलेल्या सर्व प्रकारच्या अटी शिथिल करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे. शासनाने फक्त शेतातच नुकसान होऊन उभ्या असलेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या सूचना पंचनामा करणाºया तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना दिले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी खराब अवस्थेत असलेल्या पिकांची वाहतूक करून घरी खळ्यावर आणले असून, तेही परतीच्या पावसाने सडून गेले असून, या पिकांचा शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिरावून जात असताना प्रशासन पंचनामा करीत नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाखो रु पये खर्चून सांभाळ करूनदेखील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग कर्जाच्या खायीत लोटला असल्याने शासन केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करून शेतकºयांची केवळ मनधरणी करीत असल्याची तीव्र भावना शेतकरी करीत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.