शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:03 IST

चांदवड : परतीच्या पावसामुळे चांदवड येथील देवी हट्टीजवळील नदीला रात्री एक वाजता महापूर आल्याने नदीकडेला असलेल्या आठवडेबाजार तळातील पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील पांचाळ वस्तीतील नागरिकांचे संपूर्ण संसार, वस्तू व अन्नधान्य, त्यांची कामाची हत्यारे पुरात वाहून गेल्याने जवळजवळ पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदोन चार दिवसांचे अन्न पुरेल एवढी मदत केली.

चांदवड : परतीच्या पावसामुळे चांदवड येथील देवी हट्टीजवळील नदीला रात्री एक वाजता महापूर आल्याने नदीकडेला असलेल्या आठवडेबाजार तळातील पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील पांचाळ वस्तीतील नागरिकांचे संपूर्ण संसार, वस्तू व अन्नधान्य, त्यांची कामाची हत्यारे पुरात वाहून गेल्याने जवळजवळ पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांना मदतीचा हात देण्यासाठी चांदवडचे नगरसेवक देवीदास त्र्यंबक शेलार यांनी पांचाळ वस्तीतील नागरिकांचे हाल बघून त्यांना दोन चार दिवसांचे अन्न पुरेल एवढी मदत केली.मात्र या नदीतील घाण, कचरा पावसाळ्याच्या आत नगर परिषदेने न काढल्याने या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी २००५ मध्ये अशा प्रकारचा पूर आल्याने याच पांचाळ वस्तीतील तरुण वाहून गेल्याची आठवण चांदवडकरांना अजूनही स्मरणात आहे.मोठ्या प्रमाणात कचरा व घाण अडकल्याची बाब लक्षात येताच चांदवड नगर परिषदेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने तातडीने कचरा काढण्यात आला. पांचाळवस्तीत पाणी घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन अहेर, संदीप उगले, राजेंद्र शेलार, कुंदन शेलार, सुधाकर परदेशी, राजाभाऊ अहिरे आदींसह नागरिक उपस्थित होते. तर पांचाळ वस्तीत जवळच असलेल्या स्वच्छतागृहाचे घाण पाणी या नागरिकांच्या घराजवळून जात असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सदर स्वच्छतागृहाचे घाण पाणी आमच्या दारातून जाते याची तक्रार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे केली असता ते ही जागा तुमची नसल्याचे उत्तर देतात. यावेळी अन्नधान्य वाटप केले असता लीलाबाई दशरथ सोनवणे या महिलेने आम्हाला कोणीतरी जीवदान दिल्याचे सांगून या महिलेला गहिवरून आले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस