पाळे खुर्द : कळवण तालुक्याला पाळे खुर्द परिसरात पाळे बुद्रुक, असोली, कळमथे, हिगवे, गोपाळखडी,हिंगळवाडी,बार्डे, गोसराणे या गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे कांदा द्राक्ष ,गहू, हरभरा व मिरची,टमाटे,कोबी,कोथंबीर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.कळवण तालुका हा गावठी कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील काही भागात एक महिन्यात गावठी कांद्याची काढणी सुरु होणार आहे. तर गहू सोंगणीला आला आहे. अशातच गुरुवारी सायंकाळी पाच वाजेनंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच गुरांसाठी साठविलेला चारा (मंकणी कडबा) ओला होऊन सडणार आहे. काही भागात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या आहेत. थंडगार पाण्यामुळे पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला आलेला मोहोरही झटकला गेला आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यत आहे.कांद्याचे उळे टाकल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा रोपांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये किंमतीचे उळे घेऊन पुन्हा टाकले होते. आता पीक हातात येण्याची वेळ आल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.- देविदास पवार, शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष
पाळेखुर्द परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:39 IST
पाळे खुर्द : कळवण तालुक्याला पाळे खुर्द परिसरात पाळे बुद्रुक, असोली, कळमथे, हिगवे, गोपाळखडी,हिंगळवाडी,बार्डे, गोसराणे या गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे कांदा द्राक्ष ,गहू, हरभरा व मिरची,टमाटे,कोबी,कोथंबीर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
पाळेखुर्द परिसराला पावसाने झोडपले
ठळक मुद्देकांदा, द्राक्षांसह भाजीपाला पिकांचे नुकसान