डाळिंबबागांना पाणीटंचाईबरोबर उष्णतेच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 14:42 IST2019-03-23T14:42:40+5:302019-03-23T14:42:52+5:30
जळगाव नेऊर : कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेने डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. बागंवर क्र ॉप कव्हरचे आच्छादन टाकण्यात येऊन वाचविण्यात येत आहे.

डाळिंबबागांना पाणीटंचाईबरोबर उष्णतेच्या झळा
जळगाव नेऊर : कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेने डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. बागंवर क्र ॉप कव्हरचे आच्छादन टाकण्यात येऊन वाचविण्यात येत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करु न आपले डाळिंब पिकाची निगराणी घेतली जात आहे. पाण्याची कमतरता आहेच पण उन्हापासून डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे.तसेच पाण्याचा गारवा रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरून टाकत आहे. डाळींब बागेला पाण्याची कमतरता भासत असल्याने साठविलेले शेततळे , विहिरी, बोअरवेल इ.साठे संपुष्टात आल्याने शेतकरी आपले पिके लवकर देत आहे. रायते ता.येवला येथील मनिषा गुजराथी यांनी आपल्या दहा एकरपैकी तीन एकर डाळिंब बागेला क्र ॉप कव्हरचे अच्छादन टाकून आपले डाळिंब बागा वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.