देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेनिमित्त पालखी सोहळा

By Admin | Updated: January 20, 2016 22:54 IST2016-01-20T22:53:46+5:302016-01-20T22:54:58+5:30

देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेनिमित्त पालखी सोहळा

Palakki Sankhal for the Deewargaon to Chandwad Maharat Yatra | देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेनिमित्त पालखी सोहळा

देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेनिमित्त पालखी सोहळा

चांदवड : श्रीक्षेत्र देवरगाव हे हरेकृष्ण महाराजांचे समाधिस्थळ असून, दरवर्षी या ठिकाणी कार्तिकी एकादशीला प्रतिपंढरपूर म्हणून तालुक्यातून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते.
यानिमित्त देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी पालखी सोहळ्यात देवरगाव विद्यालयातील विद्यार्थी, कलशधारी महिला, पुरुष या सोहळ्याचे आकर्षण होते. वै. ह.भ.प. श्री. हरेकृष्ण महाराज यांंचा योगीराज ज्ञानेश्वरी माउली ‘सम महारथ’ निर्माण झाला असून, प्रथमच या रथातून योगीराज हरेकृष्ण बाबांचा मुखवटा व पादुका श्रीक्षेत्र चांदवड येथे अर्धपीठ आदिमाया श्री रेणुकादेवीच्या भेटीस आला होता. सदर पालखी सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत योगीराज पिठाधीश प.पू.सुजित महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. देवरगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील हरेकृष्ण बाबांचे भक्त उपस्थित होते. देवरगावी हरेकृष्ण महाराजांचे समाधिस्थळ असून, तालुक्यातुन भक्तांची गर्दी होत असते. महारथ श्री रेणुकामातेच्या भेटीला गेला व परसूल येथे रिंगण सोहळाही पार पडला. या महारथ यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, निरीक्षक इमले यांनी बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)

Web Title: Palakki Sankhal for the Deewargaon to Chandwad Maharat Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.