पालखेड डावा कालवा पाण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:07 IST2020-12-29T20:40:24+5:302020-12-30T00:07:13+5:30

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.

Palakhed left canal waiting for water | पालखेड डावा कालवा पाण्याच्या प्रतिक्षेत

पिंपळगाव लेप परिसरातील विहिरीने पाण्याअभावी गाठलेला तळ.

ठळक मुद्देयेवला : विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना कांदे वाचवण्याची चिंता

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.
           अजून ब-याच शेतकऱ्यांचे पोळ कांद्यासाठी दोन पाणी भरण्याची आवश्यकता आहे. परंतु विहिरींचे फक्त दिवसभरातुन दोन तासच पाणी पुरवत असुन शेतकऱ्यांनी गहू, हरभरा,कांदा आदी पिके शेतात असल्याने पिकांना होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या परिसरातील ब-याच शेतकऱ्यांनी रोपे विकून टाकली आहेत.
या भागात रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीला जास्त पसंती असते.म्हणून तुरळक शेतकऱ्यांची शेततळी असल्याने पिकांना पाण्यासाठी आश्रय घेतांना दिसत आहे. अशेच शेतकरी कांदा लागवड करतांना दिसत आहेत.

अजून काही दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापासुनच पिकांना काटकसरीने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.आवकाळी पाऊसाने शेतातील रोपे खराब झाली होती. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली होती, मात्र आता विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पेरलेला कांदा रोपे विक्री करतांनाही शेतकरी दिसुन येतात. म्हणून या परिसरातील जमीनीचे क्षेत्र हे पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकरी पाणी केव्हा येणार या प्रतिक्षेत असुन लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनाकडुन होत आहे.
प्रतिक्रिया -
यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने मी विहिरीच्या भरवशावर कांदा लागवड केली होती. मात्र अचानक विहिरींने तळ गाठल्याने ते कांदे दोन दिवस ऊन्हात पडलेले होते.तसेच परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या प्रतिक्षेत आहे
- भाऊसाहेब रसाळ, शेतकरी, पिंपळगाव लेप.

 

Web Title: Palakhed left canal waiting for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.