बनकर पाटील स्कूलमध्ये रंगली चित्रकला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 17:51 IST2019-07-20T17:51:13+5:302019-07-20T17:51:27+5:30
येवला : येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. तर्फे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

बनकर पाटील स्कूलमध्ये रंगली चित्रकला स्पर्धा
येवला : येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. तर्फे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ भारत ,स्वस्थ भारत या आशयाने देशभर विविध उपक्र म राबवण्यात येत आहे. याआधारेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतविषयी जागृती व्हावी यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी स्वच्छता अभियान व स्वच्छ भारत, स्वस्थ भारत यासारखे विषय देण्यात आले होते.सहभाग नोंदविलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी हिंदी व इंग्रजी भाषेत निबंध लिहिले. यातुन विद्यार्थ्यांनी भारत स्वच्छ कसा आहे किवा कसा होईल यासाठी विविध कल्पना मांडल्या. तसेच स्वच्छ भारत,स्वस्थ भारत विषयावरील चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी गट, इयत्ता चौथी ते इयत्ता पाचवी गट ,तर इयत्ता सहावी आण िइयत्ता सातवी असे गट करून चित्र काढणे,चित्र रंगवणे, पोस्टर मेकिंग असे पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांच्या मनातील स्वच्छ भारत कसा असावा हे बघायला मिळाले.त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला यामुळे चालना मिळाली. स्पर्धेची माहिती शाळेचे समन्वयक दिपक देशमुख यांनी विद्यार्थांना दिली. यावेळी संस्थेचे संचालक प्रवीण बनकर, विनोद बनकर,अरु ण बनकर, प्राचार्य पंकज निकम हे उपस्थित होते.स्पर्धा यशिस्वतेसाठी कला शिक्षिका पूनम कानडे व रु पाली चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.