शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आनंदमेळ्यातून मांडल्या बळीराजाच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:11 IST

पाच रु पयाला देतोस का...? परवडत नाही ओ.....मग पंधराला दोन देतोस का? नाही ओ.. खर्चही सुटत नाही... आई-वडील थंडी गारठ्यात रात्रंदिवस शेतात राबतात...पिकांना पाणी देतात....मग कुठे हा भाजीपाला बाजारात विक्रीला आणतो. त्याच्यावर होणारा खर्चही फिटणेही अवघड आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांच्याच मुलांनी बळीराजाच्या व्यथा मांडल्या.

सिन्नर : पाच रु पयाला देतोस का...? परवडत नाही ओ.....मग पंधराला दोन देतोस का? नाही ओ.. खर्चही सुटत नाही... आई-वडील थंडी गारठ्यात रात्रंदिवस शेतात राबतात...पिकांना पाणी देतात....मग कुठे हा भाजीपाला बाजारात विक्रीला आणतो. त्याच्यावर होणारा खर्चही फिटणेही अवघड आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांच्याच मुलांनी बळीराजाच्या व्यथा मांडल्या. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात आनंदमेळ्यात या संवादात वास्तवातील असल्याने व्यवहारज्ञानाचे धडे गिरविणाºया व ग्राहक म्हणून वावरणाºया विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळ्यांत यानिमित्ताने झणझणीत अंजन घातले गेले. देवपूर विद्यालयात आयोजित या आनंदमेळ्याचे उद्घाटन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, नवनाथ शिंदे, एनडीएसटीचे संचालक दत्तात्रय आदिक आदी उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, वस्तू यांची दुकाने मांडण्यात आली होती.सुमारे ९०हून अधिक स्टॉल मांडले गेले होते. प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्य प्रमाणावर खरेदी केली परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन एस. एस. सैंद्रे, वैशाली पाटील, शंकर गुरुळे, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, सुवर्णा मोगल, मीनानाथ जाधव, गणेश मालपाणी, ताराबाई व्यवहारे, सोपान गडाख, रवी गडाख, बाबासाहेब गुरुळे, विलास पाटील, नारायण भालेराव आदींनी केले होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीFarmerशेतकरी