पहाडेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:22 IST2019-08-09T23:29:57+5:302019-08-10T00:22:11+5:30
अजमेर सौंदाणेपासून साधारण दोन किलोमीटर व जुनी शेमळीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावणमासनिमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करीत आहे.

पहाडेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
जुनी शेमळी : अजमेर सौंदाणेपासून साधारण दोन किलोमीटर व जुनी शेमळीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावणमासनिमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करीत आहे. सुंदर असा धबधबा डोळ्याचं पारणं फेडत आहे. बागलाण तालुक्यातील पहाडेश्वर येथील आकर्षक धबधबा असल्याने परिसरातील ग्रामस्थ मनमुराद आनंद घेत आहेत.
४सोशल मीडियावर धबधब्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. धबधब्याचे झुळझूळ वाहणारे पाणी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच सुंदर असा धबधबा श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथे पाहायला मिळाला. पहाडेश्वर येथे शंकरजींचे मंदिर आहे. श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविक येत असतात. तीन-चार दिवसांपासून संततधार पावसामुळे धबधब्याचा आनंद पर्यटक घेत आहे.