अहमदनगरच्या नाथनगरमधून सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थेविरोधात पोलिसांच्या मदतीने देवळाली कॅम्प येथील सैन्याच्या गुप्तचर विभागाने (मिलिटरी इन्टेलिजन्स) संयुक्त कारवाई करून दोघांना अटक ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) एकूण ११५ रुग्ण कोरोनामुक्त, तर १२१ नागरिकांना नव्याने कोरोना झाला आहे. बाधितांची संख्या कोरोनामुक्तच्या तुलनेत अधिक असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ९०४ वर पोहोचली आहे. ...
जुन्या आडगाव नाक्यावरील रामरतन लॉजखाली असलेल्या बंद दुकानाजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खुनाचाच प्रका ...
नांदगावसह मालेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली असताना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसते. गुरुवारी तर या दोन्ही तालुक्यांमध्ये पाऊस निरंक राहिला. शुक्रवारीदेखील दिवसभर आभाळ दाटून आलेले असताना पावसाचा ...
मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बा ...
खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ओतूरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
गेल्या २२ दिवसांपासून नवीबेज ग्रामस्थ ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरान व अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ ...
नाशिक कळवण मार्गावरील दिंडोरी शहरातील श्रीमंत योगी कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (दि. ९) रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दहा दुकानांचे शटर तोडून दुकानातील मशिनरीसह मुद्देमाल लंपास केला आहे. ...