नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चांदवड : राहुड घाटात मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव जाणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाफ्याचा पाडा (देवपूर) गावाला हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. ...
सटाणा : शहरातील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या शेजारील गृहस्थांना मारहाण करणाऱ्या फिरोज मुक्तार तांबोळी याला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. ...
पाटोदा : समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत तालुक्यातील विखरणी येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन शिबीर व जनजागृती कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. ...
ंमालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील किराणा व्यापाऱ्याची कार अडवून लाखोची रोकड हिसकावून पलायन करणाऱ्या चार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे ...
नाशिक : महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार एकूण ८४ सदस्य असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत ४२ महिला सदस्य निवडून आल्या असून, त्यातही भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. ...
संगमेश्वर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील लढत लक्षवेधी ठरली. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेचे राजाराम जाधव यांनी पराभूत केले. ...