गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कंपन्या आणि खासगी मित्रमंडळाचा गणेशोत्सव बी. डी. भालेकर मैदानावर साजरा केला जात असताना यंदाच्या वर्षापासून आयुक्तांनी त्यास मनाई केली आहे. याठिकाणी ई पार्किंगचे काम सुरू असून, पार्किंगच्या जागेत देखावे कसा उभारता येईल, अस ...
निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? य ...
डिझेल दरवाढ, टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने गत पाच दिवसांपासून बंद पुकारला आहे़ या आंदोलनात देशातील एक हजार पाचशे मालवाहतूक संघटनांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक ट्रकमालक सहभागी झाले आहेत़ ...
तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मावस बहिणीस लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाविषयी सासरच्या लोकांना सांगेन असा दम देत विवाहीत मावस बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ...
जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...