रामदास शिंदे/ पेठ : नाशिक जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा तालुक्यातील आदिवासींची वनशेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आदिवासींचा कल्पतरू म्हणून प्रसिध्द असलेल्या मोह फुलांनी बहरला असून आदिवासी जनतेला यामूळे रोजगार मिळू लागला आहे. ...
भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला. ...
दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ...
गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात सातत्याने एकाच पक्षाच्या होणाऱ्या विजयामुळे निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर राजकीय पक्ष व मतदारांकडून घेण्यात येत असलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने विविध प्रयत्न सातत्याने केले. ...
राज्यातील विविध कारागृहांत झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये तसेच कॅफेपोसा कायद्याने बंदिस्त असलेल्या सराईत हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांवर येत्या लोकसभा निवडणुकीत लक्ष ठेवण्याबरोबरच, ते निवडणुकीत कोणत्याही मार्गाने मतदान करणार नाहीत याची काळजी घे ...
सध्या राजकारणात मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची टीका विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर केली जात असतानाच राजकीय घराणेशाहीचेही मुद्दे त्यानिमित्ताने जोरकसपणे पुढे आले आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकार-देखील उघडकीस येऊ लागले ...
नाशिककरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम मंद गतीने सुरूच असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले; परंतु पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. ...