मालेगाव : महापालिकेत काँग्रेस शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांची सर उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे. ...
एकलहरे येथील दारणा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनचा शुभारंभ करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून खर्चास मंजुरी देण्यात आल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
छगन भुजबळ यांची सत्ताकारणात ‘वापसी’ झाल्याने त्यांच्याभोवतीही असाच जमावडा आता जमू लागला आहे, हे त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या विश्वासाचेच निदर्शक म्हणता यावे. ...
इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला. ...
येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती. ...
वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली. ...