येवला येथील चुनाभट्टी परिसरातील महात्मा फुलेनगर येथे एका घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात घरात झोपलेल्या महिलेस किरकोळ दुखापत झाली असून, महिलेच्या दीड वर्षाच्या बाळास सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. ...
आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या एकाच कुटुंबीयातील चौघांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघेही अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली. मात ...
कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यासाठी सज्ज झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला साथ देत नागरिकांनी सहकार्य केल्याने गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. येथून जात असलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची संख्या खूपच घटली आहे. तसेच खासगी प्रवासी वाहनांची संख्याही रोडावल ...
विंचूर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली असून, गुन्हा उघड करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली. ...
दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर ...
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन आणि गारव्याचा खेळ आता संपला असून, तालुक्याच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हाने वातावरणातील उष्माही वाढू लागला आहे. ...
गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-पेठ महामार्गावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घेऊन फरार झाला ...
मनमाड येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जण ...