सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत एकूण सात गट करण्यात आले होते. ...
सटाणा : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाकळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने आरोग्य सभापती दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
देवळा : तीन दिवसांपासून ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने ...
मालेगाव : येथील कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी कायद्यातील नियमात होणाऱ्या वारंवार बदलामुळे व्यापाऱ्यांसह, करसल्लागार, सीए यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा मनस्ताप होत असल्याने त्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने रा ...
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गेल्य ...
निफाड : गव्हावर काही रोग जमिनीतून येतात, त्यामुळे पिकांची फेरपालट करा. कृषी विद्यापीठाने संशोधन करुन तयार केलेल्या व सरकारमान्य तांबेरा प्रतिकारक्षम गहू बियाणांचा वापर करावा असे आवाहन गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे यांनी केले. ...
सिन्नर : येथील नगरपरिषदेच्यावतीने कै. कमलाकर ओतारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक २०२१ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सिन्नर चॅलेंजर्सने अंतिम सामन्यात सिन्नर सुपरकिंग्जचा पराभव करीत नगराध्यक्ष चषकावर मोहर उमटविली. स्पर्धेत ५ संघ ...
कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाइलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्यानी सुरळीत सेवा द्यावी, बंद असलेले टॉवर सुरू करावे, वनविभागाने ना हरकत दाखले द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे या ...
पिंपळगाव बसवंत : उड्डाण पुलावरून पिंपळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या. ...
मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबायती शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या काळी पिवळी गाडीने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात काळी पिवळी गाडी (क्र. एमएच ४१ ई ४७७०) वरील चालकाविरोधात गुन्हा दा ...