शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

Padma Award : अदनान सामींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, नवाब मलिकांचं खोचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:27 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

ठळक मुद्दे सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे

नवी दिल्ली - गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अदनान सामी आणि केंद्र सरकारवर टीका केलीय.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, बॉलिवूड, कला, क्रीडा, साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. गायक अदनाना सामी यांनीही राष्ट्रपतींच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला. मात्र, अदनाना सामी यांनी पुरस्कार स्विकारताच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका नवाब मलिकांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केली होती. आता, सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. जे आमच्यासोबत आहेत, त्यांना आम्ही नागरिकताही देऊ आणि पद्मश्रीही. मग, ते पाकिस्तानचे का असेनात. अदनाना सामी यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन... असे खोचक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.   दरम्यान, कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

मनसेनंही व्यक्त केली होती नाराजी

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं ते अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारAdnan samiअदनान सामी