कुऱ्हेगावच्या ग्रामस्थांकडून रस्त्यात भातलावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:18+5:302021-08-20T04:19:18+5:30
इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव ते गोंदे दुमाला या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठे खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. या ...

कुऱ्हेगावच्या ग्रामस्थांकडून रस्त्यात भातलावणी
इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव ते गोंदे दुमाला या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठे खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीदेखील अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
यावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना मोठेमोठे खड्डे पडल्याने छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. घोटी तसेच नाशिक येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा मुख्य एकमेव रस्ता असल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. घोटी येथे बॅंका, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, दवाखाने यासह छोटे-मोठे उद्योगधंदे व व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे येथे ग्रामस्थांचा नेहमीच संपर्क असतो. तसेच परिसरातील दुग्धव्यावसायिकदेखील याच रस्त्याने ये-जा करीत असतात.
महत्त्वाचे म्हणजे गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींमध्ये परिसरातील जवळपास पाच ते सहा गावातील कामगार रोजगारासाठी याच रस्त्याने जात असल्यामुळे या रस्त्याची दैनावस्था कधी दूर होणार असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कुऱ्हेगावचे माजी उपसरपंच जयराम गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रसंगी दत्तू धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल धोंगडे, जितू पवार, नामदेव धोंगडे, भगवान धोंगडे, बाळू धोंगडे, हरिभाऊ गुळवे, अर्जुन धोंगडे, राजाराम धोंगडे, प्रकाश गव्हाणे, रामदास धोंगडे, शंकर धोंगडे, गंगाराम धोंगडे, तुकाराम धोंगडे, उमेश पवार, विष्णू धोंगडे, दिलीप गव्हाणे, नवनाथ गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट...
कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्तीविना दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनदेखील संबंधित विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
- जयराम गव्हाणे, माजी उपसरपंच, कुऱ्हेगाव.
(१९ नांदूरवैद्य)
कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर भातलावणी करताना जयराम गव्हाणे, दत्तू धोंगडे, विशाल धोंगडे, जितूपवार व ग्रामस्थ.
190821\19nsk_45_19082021_13.jpg
कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर भातलावणी करताना जयराम गव्हाणे, दत्तु धोंगडे, विशाल धोंगडे, जितु पवार व ग्रामस्थ.