इगतपुरी तालुक्यात भाताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:48 IST2019-10-31T21:47:51+5:302019-10-31T21:48:14+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे.ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती. शेतकर्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते.परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरणात पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, धामणगाव, टाकेद, अडसरे, गंभीरवाडी, सोनोशी, आंबेवाडी, खेड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारीशिंगवे, बांबळेवाडी या भागातील भातशेती पाण्याखाली आली आहे.

Paddy loss in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात भाताचे नुकसान

इगतपुरी तालुक्यात भाताचे नुकसान

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे.
ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती. शेतकर्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते.परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरणात पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, धामणगाव, टाकेद, अडसरे, गंभीरवाडी, सोनोशी, आंबेवाडी, खेड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारीशिंगवे, बांबळेवाडी या भागातील भातशेती पाण्याखाली आली आहे. या पावसामुळे या परिसरातील भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आणि सततच्या पावसामुळे होणाºया रिपरिपमुळे अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या भात शेतीची कामे खोळंबली आहेत. ढगाळ वातावरणामुळे भातशेतीच्या गरे, हाळे, इंद्रायणी, आर २४, वाय एस आर, १००८ , सोनम, रूपाली, पूनम, सोनाली या भाताच्या वाणांच्या प्रजातीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होता.
ही जमीन दोस्त होऊन पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर बघावयास मिळतो आहे.भातासह,उडीद,सोयाबीन,वरई,खुरासनी,आदी पिके धोक्यात आली आहे.तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी या परिसरातील शेतकर्यांची मागणी आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे भातशेती जोमात आहे.परंतु ऐन दिवाळी सनाच्या मोसमात ढगाळ वातावरणामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान झालेले आहे.भातशेतीत सर्वत्र पाणी असल्यामुळे यंदा भात काढणी यंत्राचा वापर होत नसल्याने मजुरांकडूनच भात कापणी करावी लागत आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी शेतकर्यांची प्रमुख मागणी आहे.

Web Title: Paddy loss in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक