देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:49 PM2017-11-22T16:49:27+5:302017-11-22T16:52:40+5:30

नाशिक : शेतात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धास सहा संशयितांनी बेदम मारहाण करून त्याच्या शेतातील भाताचे पीक कापून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२१) लहवित शिवारात घडली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Paddy crop theft by assaulting the elderly of Deolali | देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी

देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देलहवित शिवारातील घटनासहा जणांविरोधात गुन्हा दाखल


नाशिक : शेतात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धास सहा संशयितांनी बेदम मारहाण करून त्याच्या शेतातील भाताचे पीक कापून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२१) लहवित शिवारात घडली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहवित येथील रहीवासी पांडू धोंडू मुठाळ (७५) हे मंगळवारी आपल्या सर्व्हे नंबर १८६/१ या शेतात असताना संशयित दादा त्र्यंबक लोहकरे, धोंडूराम पांडू कोरडे, त्र्यंबक कचरु कोरडे, हिराबाई कचरू कोरडे, भागुबाई धोंडूराम कोरडे, लक्ष्मीबाई निवृत्ती कोरडे (सर्व रा. लहवित) हे बळजबरी शेतात आले़ यानंतर सर्वजण मुठाळ यांच्या अंगावर धाऊन गेले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना मुठाळ यांचा मुलगा बाळू हा मध्यस्थी करीत असताना संशयितांनी त्यालाही शिवीगाळ केली़ तसेच शेतातील भाताचे पिक कापून चोरून नेले़
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी धोंडूराम पांडू कोरडे व त्र्यंबक कचरु कोरडे या दोघांनाही अटक केली आहे़

Web Title: Paddy crop theft by assaulting the elderly of Deolali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.