शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यावरचे विद्यार्थी म्हणतात हजारपर्यंतचे पाढे; त्र्यंबकेश्वरचे शिक्षक केशव गावित यांची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 07:51 IST

या पाड्यापासून ५०० मीटरवर डोंगरावर एका शेतकऱ्याने घराशेजारील झोपडी शाळेसाठी दिली आहे

- धनंजय रिसोडकरनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५५ विद्यार्थी  बेपासून हजार व त्यापुढे सुमारे ११५० पर्यंतचे पाढेही तोंडपाठ म्हणतात. त्याशिवाय सर्व विद्यार्थी एकाचवेळी दोन्ही हातांनी दोन भिन्न विषय किंवा एका हाताने भाषा आणि दुसऱ्या हाताने गणित सोडवण्याचा  चमत्कारदेखील करून दाखवतात. तसेच एका हाताने मराठी, तर दुसऱ्या हाताने इंग्रजीही सहज व वेगाने लिहून दाखवण्याची सर्व किमया केशव गावित या शिक्षकाने घडविली आहे. 

त्र्यंबकनजीकच ३५ कुटुंबे असलेला हिवाळी हा पाडा आहे. या पाड्यापासून ५०० मीटरवर डोंगरावर एका शेतकऱ्याने घराशेजारील झोपडी शाळेसाठी दिली आहे. त्याठिकाणच्या शाळेत केशव गावित हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  विशेष म्हणजे गावित यांनी या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून प्रारंभ करत आता त्यांना इतक्या वेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले आहे की, शहरातील इंग्रजी शाळांतील मुलांनाही जे जमत नाही ते सर्व काही हिवाळीच्या शाळेतील विद्यार्थी सहजरीत्या करून दाखवतात. एकाचवेळी दोन्ही हातांनी सहज लिहिताना दोन्ही लिखाणांची गती सारखीच असून कुणी एका हाताने चित्र काढतो, तर दुसऱ्या हातांनी पाढे किंवा गणित सोडवतो, तेदेखील अगदी सहज. 

विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्यपहिलीमध्ये दाखल होण्याआधीच मुलांना लेखन, वाचन, पाढे, काही शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग पाठ असतात. पहिलीतील विद्यार्थ्यांना ५० पर्यंत तर पुढील विद्यार्थ्यांचे हजार ते बाराशेपर्यंतचे पाढे पाठ आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला वेल्डिंग, इलेक्ट्रिक, शिवणकाम, गवंडीकाम, यांसारखी कौशल्ये आत्मसात आहेत. गावाच्या भिंतींवर वारली चित्रे काढली आहेत. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

शाळा भरते ३६५ दिवस 

हिवाळीतील या शाळेला एकही दिवस सुटी नसून ती ३६५ दिवस भरते. दररोज १२ ते १३  तास शाळा भरते. सकाळी ७:३० वाजता बालवाडी ते ९ वी पर्यंतचे विद्यार्थी येतात. 

केशव गावित हे एकमेव शिक्षक  सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात. तसेच नियमित अभ्यासासह खेळ, सेंद्रिय शेतीसह व्यावहारिक धडेही विद्यार्थी गिरवतात. रात्री ९ पर्यंत शाळा सुरू असते. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक