वडनेरभैरवच्या सरपंचपदी पाचोरकर ; उपसरपंचपदी योगेश साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:51 IST2021-02-26T17:50:59+5:302021-02-26T17:51:30+5:30
वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले.

वडनेरभैरवच्या सरपंचपदी पाचोरकर ; उपसरपंचपदी योगेश साळुंखे
ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार उत्तम भालेराव यांच्या गटाला आठ जागा, तर कादवाचे माजी संचालक संजय पाचोरकर, भाजपचे नेते बाळासाहेब माळी, माजी उपसरपंच बाबाजी सलादे, पोपटराव पाचोरकर यांच्या गटाला पाच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्ते यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. प्रतिभा खेडकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. खिराडकर या भालेराव गटात सामील झाल्या तर भालेराव गटातीलच स्व.अशोक शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पाचोरकर यांनी सोडचिठ्ठी देत विरोधी गटांत सामील होत सरपंचपदावर विराजमान झाले. जास्त जागा निवडून आणूनही सरपंचपदाच्या निवडीत उत्तम भालेराव यांचे पुतणे रावसाहेब भालेराव यांना एका मताने पराभव पत्करावा लागला. निवडणूकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली होती. दि. २५ रोजी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी सुनील पाचोरकर व रावसाहेब भालेराव यांनी अर्ज दाखल केला होता. यात पाचोरकर यांना नऊ, तर भालेराव यांना आठ मते मिळाली, तर उपसरपंचपदासाठी साळुंखे यांना नऊ व प्रतिभा खिराडकर यांना आठ मते मिळाली. १७ सदस्यांनी निवडप्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी द्यानेश्वर सपकाळे यांनी सरपंचपदी पाचोरकर, तर उपसरपंचपदी साळुंखे निवडून आल्याचे घोषित केले.
यावेळी सदस्य सुरेश वक्ते, मंगल देवरे, अरुण पवार, संजय पवार, विजय शिरसाठ, माधुरी जाधव, सुनील पाचोरकर, मंजूबाई निमकर, भागूबाई बिन्नर, अश्विनी डंबाळे, संगीता सगर, रत्ना माळी, सुनीता भालेराव, अमोल माळी यांच्यासह संपतराव वक्ते, पोपटराव पाचोरकर, बाळासाहेब माळी, बाबाजी सलादे, माजी चेअरमन राजाराम तिडके, संजय पाचोरकर, नाना सलादे, शशी वक्ते, अमित माळी, दीपक पाचोरकर, डॉ. सुनील आहेर, डॉ.प्रदीप परदेशी, माधवराव शिंदे उपस्थित होते.