ओझरटाऊनशिपचे शर्मा यांना ‘गॅ्रण्ड मास्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST2017-08-06T00:08:35+5:302017-08-06T00:09:11+5:30
भारत मार्शल आटर््स विकास बोर्डतर्फे पानीपत येथे आयोजित मार्शल आटर््स चॅम्पियनशिप स्पर्धेत ओझरटाऊनशिप कराटे क्लासचे मुख्य प्रशिक्षक एस.के. शर्मा यांना ग्रँड मास्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शर्मा एचएएलचे निवृत्त अधिकारी आहे.

ओझरटाऊनशिपचे शर्मा यांना ‘गॅ्रण्ड मास्टर’
ओझरटाऊनशिप : भारत मार्शल आटर््स विकास बोर्डतर्फे पानीपत येथे आयोजित मार्शल आटर््स चॅम्पियनशिप स्पर्धेत ओझरटाऊनशिप कराटे क्लासचे मुख्य प्रशिक्षक एस.के. शर्मा यांना ग्रँड मास्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शर्मा एचएएलचे निवृत्त अधिकारी आहे.
पानीपत येथील कम्युनिटी हॉल येथे नुकत्याच झालेल्या मार्शल आटर््स चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेतील अंतिम फेरीत किक बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्रने प्रथम क्र मांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक राजस्थानने तर हरियाणाने तृतीय क्रमांक पटकाविला. कराटे स्पर्धेत मध्य प्रदेश प्रथम, हरियाणा द्वितीय व उत्तर प्रदेशने तृतीय क्र मांक मिळविला तर तायक्वान्डो स्पर्धेत हरियाणाचे स्पर्धकानी चॅम्पियन शिप मिळविली स्पर्धेत ३०० खेळाडू व ५० प्रशिक्षक सहभागी झाले होते.