ओझरला पाच ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:36 IST2018-01-11T23:49:50+5:302018-01-12T01:36:14+5:30
ओझरटाऊनशिप : घर बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्याने पाच घराच्या दरवाजाचे कोयंडा तोडून चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) ओझर येथे घडली.

ओझरला पाच ठिकाणी घरफोडी
ओझरटाऊनशिप : घर बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्याने पाच घराच्या दरवाजाचे कोयंडा तोडून चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) ओझर येथे घडली. एका ठिकाणाहून १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी गेल्याची नोंद ओझर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, इतर चार ठिकाणांहून किती ऐवज गेला त्याची माहिती मिळू शकली नाही.
गुरुवाररी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास रावसाहेब शिवराम कदम, (राहा. फ्लॅट नं. ३ प्रणिती पार्क, विमलनगर) घर बंद करून बाहेर गेले असताना घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करत एलईडी टीव्ही व रोख ९ हजार पाचशे असा एकूण १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच वेळी राजन अशोक शिरसाठ (राहा. प्लॉट नं. ४७ , यमुनानगर, साईधाम ओझर), पवन प्रदीप सौचे (राहा. यमुनानगर, साईधाम ओझर), प्रकाश काशीनाथ वनवे (राहा. प्रिन्स अपार्टमेंट) व. छाया आढाव (राहाणार प्रेम दौलत अपार्टमेंट, पंचवडनगर) यांच्या ही बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून ऐवज चोरून नेला.
महिनाभरापासून ओझर परिसरात भुरट्या चोºया व घरफोड्यांच्या घटनात वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.