ओझरला ४६ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:40 IST2017-08-18T00:40:21+5:302017-08-18T00:40:32+5:30
ओझर : परिसरातील सायखेड्या फाट्यावरील जानोरीकडे जाणाºया रस्त्यावरील एका इमारतीतील गाळ्यांत पोलिसांनी धाड टाकून ४६ लाख ५५ हजार रूपयाचा गुटखा पकडला आहे.

ओझरला ४६ लाखांचा गुटखा पकडला
ओझर : परिसरातील सायखेड्या फाट्यावरील जानोरीकडे जाणाºया रस्त्यावरील एका इमारतीतील गाळ्यांत पोलिसांनी धाड टाकून ४६ लाख ५५ हजार रूपयाचा गुटखा पकडला आहे. परिसरात विक्रीसाठी हा साठा करून ठेवण्यात आला होता. जावेद अब्दूल रज्जाक शेख या इसमाचा हा गुटखा असल्याचे समजले. यात विमल गुटखा,मिराज तंबाखु, हिरा गुटखा, मलाम गुटखा असा पकडलेला माल आहे. पोलिस अधिक्षक संजय दराडे व नाशिक ग्रामिणचे उप-विभागीय पोलिस आधिकारी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.