ओझरटाऊनशिपला डासांमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:40 IST2021-07-13T23:21:47+5:302021-07-14T00:40:10+5:30
ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कामगारांच्या वसाहतीमध्ये डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त व हैराण झाले आहेत. डासांच्या प्रादुर्भावाने साथीच्या रोगाचा प्रसार होऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, म्हणून सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी एचएएल व्यवस्थापनाने टाऊनशिपमधील सर्व भागात फवारणी करून, डास निर्मूलन योजना राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ओझरटाऊनशिप वसाहतीत कोरोना विषाणू संसर्गामुळे गेले दीड वर्ष नागरिक भयग्रस्त होते, ते भय आता कमी झाले असतानाच, वसाहतीत गेल्या दोन महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले असून प्रादुर्भाव वाढला असल्याने, सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा प्रसार होऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हणून वसाहतीमधील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी एचएएल व्यवस्थापनाने डास निर्मूलन योजनेंतर्गत फॉगिंग मशीनच्या साह्याने औषधाची फवारणी करून, डास निर्मूलन योजना राबवावी, तसेच वसाहती मधील वाढलेल्या काँग्रेस गवताची कापणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.