ओझरला महिलेच्या गळ्यातील गंठण चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:34 IST2019-10-11T23:19:41+5:302019-10-12T00:34:57+5:30
सत्संगासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ओढून चोरून नेल्याची घटना भरदिवसा ओझर येथे घडली.

ओझरला महिलेच्या गळ्यातील गंठण चोरले
ओझर टाउनशिप : सत्संगासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ओढून चोरून नेल्याची घटना भरदिवसा ओझर येथे घडली.
गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास वृषाली राजू पवार (४५, रा. सिन्नरकर टाउन, रो हाउस नं. ३२ ए) या सत्संगासाठी जात
असताना अग्रवाल पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या शिवाजीनगरमधील
प्रज्ञा बंगल्यासमोर मोटारसायकलवरून आलेल्या ३० ते ४० वयोगटातील दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ मोटारसायकल थांबवून
पवार यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व तुटकी पोत (किंमत ९८ हजार) जबरदस्तीने ओढून मोटारसायकलवरून पळ काढल्याची तक्र ार वृषाली पवार यांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे करीत आहेत.