ओझरला १९ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:51 IST2020-04-04T14:51:15+5:302020-04-04T14:51:29+5:30

ओझर :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनाकारण गावात फिरणाऱ्या एकोणावीस दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 Ozar seizes 49 bicycles | ओझरला १९ दुचाकी जप्त

ओझरला १९ दुचाकी जप्त

ओझर :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनाकारण गावात फिरणाऱ्या एकोणावीस दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.तर सुकेणे गावातील देखील २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ६० दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता आणि लासलगाव येथे एक कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळल्या पासून निफाड तालुक्यात काही गावांनी स्वत:हून गावच्या सीमा बंद केली असून पुढील काही दिवस संपूर्णपणे लॉक डाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाशर््वभूमीवर प्रशासनाने देखील आजूबाजूच्या सात गावांना होम क्वांरनटाईन करून ठेवले आहे. यात अत्यावश्यक सेवादेखील बंद केली आहे. केवळ दूध संकलन करणाऱ्यांना ठराविक कालावधीत ठरवून देण्यात आला आहे . यातच ओझर गावात विनाकारण मोटरसायकलवरून फिरणाºया टवाळखोरांना समज आणि दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडील १९ दुचाकी जप्त केल्या आहेत तर एका वाहनधारकांवर गुन्हा नोंद केला आहे.
--------------------------
वारंवार सूचना देऊनही लोक ऐकत नाहीत त्यामुळे अशी कठोर निर्णय घेणे आम्हाला भाग पडते. निफाड तालुक्यात एक कोरोना रु ग्ण सापडल्यानंतर ही लोकांना अद्यापही कोरोनाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही . ओझर गाव लॉकडाऊन केले असून जी टवाळखोर यापुढे बाहेर दिसतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल.
-भगवान मथुरे ,पोलीस निरीक्षक, ओझर.

Web Title:  Ozar seizes 49 bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक