ओझर : मोटारसायकल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST2021-06-16T04:18:52+5:302021-06-16T04:18:52+5:30

शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेदरम्यान किशोर अंबादास रासकर (रा. प्रभुधाम मंदिराजवळ, ओझर) यांनी त्यांची ...

Ozar: Motorcycle Lampas | ओझर : मोटारसायकल लंपास

ओझर : मोटारसायकल लंपास

शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेदरम्यान किशोर अंबादास रासकर (रा. प्रभुधाम मंदिराजवळ, ओझर) यांनी त्यांची काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच-१५ जीएस-९९२२) लावून ते कामानिमित्त जवळच गेले असताना ती चोरून नेल्याचे ९.३० वाजेला परत आल्यानंतर निदर्शनास आले. त्यांनी सोमवारपर्यंत शोध घेऊनही ती न मिळाल्याने मंगळवारी चोरीची तक्रार नोंदविली. याप्रकरणी ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

ओझर येथून दुचाकीची चोरी

ओझर टाऊनशिप : अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ओझर येथे शुक्रवारी (दि.११) रात्री ११.४५ ते दि. १२ जूनच्या पहाटे ६ वाजेदरम्यान घडली. जाकेश विजय हिरे (रा. सद्‌गुरुकृपा अपार्टमेंट, टिळकनगर, ओझर) यांनी त्यांची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल (एमएच-१५ जीई-६०३९ ) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली असताना रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सकाळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रविवारपर्यंत सर्वत्र शोध घेतला; परंतु मोटारसायकल मिळून आली नाही. हिरे यांनी ओझर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार काल नोंदविल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल करीत आहेत.

Web Title: Ozar: Motorcycle Lampas