ओझरला अपघातात पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:41 IST2020-03-05T21:40:45+5:302020-03-05T21:41:08+5:30
ओझर : येथील मुंबई आग्रा महामार्गावरील सायखेडा फाट्यावर ट्रकच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. तुकाराम एकनाथ कदम रा निपाणी मळा, ओझर (८७) असे मृताचे नाव आहे.

ओझरला अपघातात पादचारी ठार
ओझर : येथील मुंबई आग्रा महामार्गावरील सायखेडा फाट्यावर ट्रकच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. तुकाराम एकनाथ कदम रा निपाणी मळा, ओझर (८७) असे मृताचे नाव आहे.
कदम हे सकाळी उड्डाणपूलच्या खालून पायी जात असताना समोरून आलेल्या पी.बी.०२. डीटी.४६४९ या मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकने त्यांना धक्का दिला असता त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्याठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिसरोड वरून मुख्य वाहतूक सुरू आहे. त्यात स्थानिक वाहन व नागरिकांची होणारी गर्दी पाहता महामार्गावरील दोन-तीन ठिकाण मृत्यूचे सापळे बनत चालले आहे. अपघातानंतर लोकांनी एकत्र येत काही काळ महामार्ग रोखून धरला होता. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आंदोलकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली. तुकाराम कदम हे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष व माजी उपसरपंच अशोक कदम यांचे वडील होत.