ओझरला २९ कोरोना नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:09 IST2021-03-20T21:09:06+5:302021-03-20T21:09:25+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर व टाऊनशिप परिसरात शनिवारी २९ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १४६५ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा म्रुत्यू झाला असुन १२६९ रुग्ण बरे झाले आहेत. १६४ रुग्णावर उपचार सुरू आहे.

ओझरटाऊनशिप ४, दत्त नगर १,आरके काँलनी ४, सिन्नरकर टाऊन १, पंचवड नगर ५, मधला माळीवाडा १, रेणुका नगर ३, सिद्धार्थ नगर १, संभाजी चौक २, घाण पाण्याची टाकी १, महादेव मठ २, सायखेडा फाटा १, निवृत्तीनाथ नगर १, श्री कृष्ण नगर १, पंडित कॉलनीतील एका रुग्णांचा समावेश आहे.
ओझर सह परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.