ओझर ग्रामपंचायतीच्यागाळ्यांचे लिलाव

By Admin | Updated: October 29, 2016 00:22 IST2016-10-29T00:21:40+5:302016-10-29T00:22:51+5:30

ओझर ग्रामपंचायतीच्यागाळ्यांचे लिलाव

Ozar Gram Panchayat Auction | ओझर ग्रामपंचायतीच्यागाळ्यांचे लिलाव

ओझर ग्रामपंचायतीच्यागाळ्यांचे लिलाव

ओझर : येथील ग्रामपंचायतीने गावातील जुन्या पाण्याची टाकी पाडून तेथे बांधलेल्या व्यवसायिक गाळ्याचे लिलाव बुधवारी झाले. यामध्ये ग्रामपंचायतीने एक लाख रुपये अनामत घेतली होती. तब्बल ४४ जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सदर गाळे हे लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स तत्त्वावर देण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी ५६ लाखाची वाढ झाली आहे. एकूण चार गाळ्यांना अतिक शेख यांनी ३५ लाख, महेश झांबरे यांनी ४१ लाख, विजय भडके ५५ लाख, बाळासाहेब क्षीरसागर २५ लाखांना घेतला. यावेळी सरपंच जान्हवी कदम, उपसरपंच शुभांगी भडके, सदस्य यतिन कदम, हेमंत जाधव, प्रकाश महाले, गिरीश वलवे, ग्रामसेवक देवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. आता याच उत्पन्नातून गावचा अंतर्गत विकास कसा होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, अशी चर्चा यावेळी सुरू होती. (वार्ताहर)



 

Web Title: Ozar Gram Panchayat Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.